विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीवरून राजकारण सध्या तापले आहे.पक्ष विपक्ष एकमेकांवर टीका करत आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे काँग्रेस पक्षात सामील झाले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्यावर वक्तव्ये केली. या वर भाजपने ब्रिजभूषण यांना समज देत असून असे न करण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या माजी प्रमुखांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झाल्याबद्दल दोन कुस्तीपटूंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मीडियाशी बोलताना ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले होते की, विनेश आणि बजरंग यांनी कुस्तीमध्ये नाव कमावले आणि त्यांच्या खेळाच्या पराक्रमामुळे प्रसिद्ध झाले पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे नाव पुसले जाईल.