तिरुवन्नमलाई येथे झालेला भूस्खलनमधून 7 जणांचे मृतदेह मिळाले

मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (10:46 IST)
Tamil Nadu News: तामिळनाडूतील फंगल चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे, काल तिरुवन्नमलाई येथे खडक कोसळला, ज्यामध्ये 7 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली होती. या अपघातानंतर लगेचच एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य सुरू केले. त्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.
ALSO READ: जंगलात सापडलेल्या मृतदेहाबाबत वर्धा पोलिसांचा खळबळजनक खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार आज बचाव कार्यादरम्यान, एनडीआरएफच्या टीमने खडकाखाली अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहे. फंगल चक्रीवादळामुळे  आलेल्या पावसामुळे तिरुवन्नमलाई येथे घरावर मोठा दगड कोसळल्याने पाच मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. पथकाने 4 मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला असून कुटुंबाला 5 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रक्कम जाहीर केली आहे. तिरुवन्नमलाई येथे मुसळधार पावसामुळे अन्नामलाईयार टेकडीच्या खालच्या उतारावर असलेल्या घरांवर मोठा दगड पडला. त्यात सुमारे 7 लोक अडकले होते, ज्यांचे मृतदेह आता बाहेर काढण्यात आले आहे. यानंतर संपूर्ण परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती