काळा पैसाधारकांची माहिती देता यावी यासाठी केंद्र सरकारने आता ईमेल आयडी सुरु केला आहे. काळा पैसाधारकांची माहिती कोणाकडे असल्यास ते या ईमेलवर माहिती देऊ शकतील अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी दिली आहे. यासाठी
[email protected] असा ईमेल आयडी आहे. या ईमेलवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून माहिती मिळताच संबंधीतांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.