पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून यात तृणमूल काँग्रेसने २२ तर भाजपाने तब्बल १८ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला. विशेष म्हणजे २०१४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे फक्त दोन खासदार होते. भाजपाची यंदाची कामगिरी तृणमूल काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता तृणमूल काँग्रेसमधील नेतेमंडळी भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे दिसते. सुभ्रांशू रॉय, तुषारक्रांती भट्टाचार्य आणि डाव्या पक्षांमधील आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपात प्रवेश केला. दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.सुभ्रांशू हे मुकुल रॉय यांचे चिरंजीव आहेत.