तांत्रिक घोळामुळे एका जागेचा निकाल रद्द करण्यात आला. यात भाजपच्या कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या विजयी उमेदवाराचा निकाल रद्दबातल करण्यात आला होता. मतमोजणीनुसार जगदीश शेट्टार हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगानं हा निकाल रद्द करत राखून ठेवला होता. अखेरी मध्यरात्री जगदीश शेट्टार यांनाच विजयी घोषित करण्यात आलं. आता कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.