एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत खेड्यापाड्यात शौचालय बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सरकार करत आहे. पण या मोहिमेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत बिहारमधील एका गावाने घराघरात शौचालय बांधण्याच्या मोहिमेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचे कारण काय तर गावकर्यांच्या मनात ठासून भरलेली अंध श्रद्धा आणि भीती होय.
शौचालय बांधणे अशुभ असून यामुळे अनेक दुर्दैंवी घटना घडतात अशी भीती या लोकांना आहे म्हणून शौचालय बांधण्यास ठाम नकार या गावकर्यांनी दिला आहे. बिहारमधल्या नावाडा जिल्ह्यात गाझीपूर नावचे गाव आहे. या गावातील प्रत्येक कुटुंब शौचालय बांधणे अशुभ समजतात. शौचालय बांधण्याच्या प्रयत्न करणारे कुटुंब दुर्दैंवाच्या फेर्यात अडकतात त्यांच्या सोबत वाईट घटना घडतात, अशी भीती या लोकांच्या मनात घर करून आहे. तेव्हा या गावात कोणत्याही कुटुंबाने शौचालय बांधले नाही.