एक कॉल आला आणि नवरीऐवजी मेहुणीसोबत सात फेरे

गुरूवार, 4 मे 2023 (17:01 IST)
कार्यक्रमात अनेक प्रकारच्या घटनांचा उल्लेख तुम्ही ऐकला असेल, पण बिहारमधील सारण जिल्ह्यातील मांझी पोलीस स्टेशन परिसरात एका लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान वधूची धाकटी बहीण म्हणजेच मेहुणीची विचित्र घटना पाहायला मिळाली. 
 
बिहारमध्ये असा विवाह झाला ज्यामध्ये वधूला सोडून वराने मेव्हणीशी म्हणजेच वधूच्या लहान बहिणीशी लग्न केले. बहिणीच्या मिरवणुकीत धाकट्या बहिणीने असा गोंधळ घातला की मोठ्या बहिणीचे लग्न मोडले.
 
नेमकं काय घडलं?
छपरा शहरातील बिंटोली येथील रहिवासी जगमोहन महतो यांचा मुलगा राजेश कुमार याच्या लग्नाची मिरवणूक भाभौली गावात पोहोचली होती. वधू रिंकू कुमारीचे वडील रामू बिन वरातीचे त्यांच्या दारात स्वागत करत होते. द्वारपूजेचा विधी आनंदात संपन्न झाला. नंतर शेकडो लोकांच्या उपस्थितीत जयमालाची प्रक्रियाही पार पडली. यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अंगणात कन्या निरीक्षण सुरू असतानाच वधूची धाकटी बहीण पुतुल कुमारी हिने गुपचूप छतावर चढून नवरदेवाला बोलावून धमकावले. तिने नवरदेवाला म्हणले की तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी छतावरून उडी मारून जीव देईन.
 
यानंतर लग्नाचे सर्व विधी आटोपून आनंदाचे वातावरण तणावात बदलले. प्रसंग पाहून नवरदेवाने घाईघाईने आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना बोलावले जे ऑर्केस्ट्रा पाहण्यात तल्लीन झाले होते. गोंधळ बघून मुलीवाले देखील पोहचले आणि त्यांच्या वाद आणि मारहाण पर्यंत स्थिती बिघडली. दरम्यान मुलीकडील लोकांनी नवरदेवाला आणि नातेवाईकांना अंगणात बांधून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
 
दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली तेव्हा पोलिस घटना स्थळी पोहचले. दोघांच्याही कुटुंबीयांच्या समजूतीनंतर परिस्थिती शांत झाली आणि मोठ्या बहिणीचे लग्न न करता राजेशचे लग्न पुतुलशी झाले.
 
पुतुलचे राजेशसोबत पूर्वीपासून प्रेमसंबंध होते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
मात्र या लग्नाची परिसरात जोरदार चर्चा होत असून याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती