बालाजीचा लाडूचा प्रसाद आता मोफत

सुप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थानाने 31 डिसेंबर रोजी जाहीर केल्याप्रमाणे भाविकांना लाडूचा प्रसाद मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार याची अंमलबजावणी सुरू झाली. यापूर्वी फक्‍त पायी येणार्‍या भाविकांसाठी 20 हजार लाडू मोफत देण्यात येत होते. पायी येणार्‍या भक्‍तांसाठी 175 ग्रॅमचा लाडू तर इतर भक्‍तांसाठी 40 ग्रॅमचा लाडू देण्यात येत होता. आता सर्वच भक्‍तांना मोफत प्रसाद मिळेल. 
 
नवीन नियमावलीनुसार 175 ग्रॅमचे 80 हजार लाडू भक्‍तांना मोफत वाटण्यात येणार आहेत. अर्थात अतिरिक्‍त प्रसाद हवा असल्यास मात्र एका लाडूसाठी 50 रुपये द्यावे लागतील. दरम्यान, प्रत्येक भाविकाला मोफत लाडू देऊनही अनुदान काढून टाकल्याने देवस्थानची वर्षाला 250 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती