अयोध्येतील राम मंदिर आणि २ हजार फूट खाली एक कॅप्सुल काय आहे हे प्रकरण

सोमवार, 27 जुलै 2020 (08:37 IST)
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होईल त्यासाठी तयारीसुरु झाली आहे.या येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत भूमिपूजन करतील. त्यानंतर मंदिराची उभारणी सुरू होणार आहे. अयोध्येत उभारण्यात येणारं राम मंदिर अनेकार्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. या मंदिराचं बांधकाम केलं जात असताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधल्या एका सदस्यानं दिली आहे.
 
यानुसार राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सुल ठेवण्यात येणार आहे. असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असलेल्या कामेश्वर चौपाल यांनी स्पष्ट केलं आहे. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा झाल्यास त्याला त्या कॅप्सुलची मदत होईल. त्याला राम जन्मभूमीबद्दलचा महत्त्वपूर्ण तपशील त्यातून मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
अयोध्येतील राम जन्मभूमीबद्दल ९ महिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. नंतर न्यायालयानं ९ नोव्हेंबरला ऐतिहासिक निकाल दिला. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला होत. ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येला भेट देतील. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार व भव्य असे राममंदिर उभे राहणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती