यमुनातीरी सर्व प्रमुख नेत्यांच्या समाध्या असून, तिथेच अटलबिहारी वाजपेयी यांची समाधी आणि स्मृतिस्थळ उभारण्यासाठी यूपीएच्या काळातील कायदा बदलला जाणार आहे. यमुनातीरी यापुढे कोणत्याही नेत्याचे समाधीस्थळ होऊ नये, असा निर्णय आधी घेण्यात आला होता.त्यासाठी शहरी विकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. हे समाधीस्थळ राजघाटाच्या मागेअसू शकेल. ते अटल स्मृतिस्थळ, अटलघाट किंवा अटल किनारा नावाचे असेल. या प्रकरणी सरकारला विरोधक सहकार्य करतील, अशी भाजपाची अपेक्षा आहे.