भारतात लाचखोरीचेप्रमाण एशिया – पॅसिफिक देशापेक्षा सर्वाधिक

बुधवार, 8 मार्च 2017 (09:46 IST)
भारतातील लाचखोरीचे प्रमाण एशिया – पॅसिफिक देशातील अन्य कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक असून एका पहाणीनुसार दोन तृतियांश भारतीयांना सरकारी कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागते असे म्हटले आहे. चीन मध्ये हे प्रमाण 26 टक्के इतके आहे तर पाकिस्तानात 40 टक्के आहे. जपान मध्ये, सर्वात कमी म्हणजे 0.2 टक्के लोकांना सरकारी कार्यालयातून काम करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते. दक्षिण कोरीयात लाचखोरीचे हे प्रमाण 3 टक्के इतके आहे.
 
चीनमध्ये गेल्या वर्षभरात लाचखोरीच्या प्रमाणात तब्बल 73 टक्के इतकी वाढ झाली आहे. तर गेल्यावर्षभरात भारतातील लाचखोरीच्या प्रमाणात 41 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 16 देशातील 20 हजार लोकांच्या मुलाखती किमान चिरीमिरी तरी द्यावीच लागते. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संस्थेतर्फे करण्यात आलेल्या पहाणीत ही माहिती पुढे आली आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्हाला लाच दिल्याशिवाय गत्यंतरच नसते असे 69 टक्के भारतीघेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा