ओवेसींची मोदींवर खोचक टीका

शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017 (12:04 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर अएआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर जळजळीत टीकास्त्र सोडले. स्नानगृहात रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला तर डॉक्टर साहेबांनाच ठाऊक आहे, असे मोदींनी मनमोहन सिंग यांना उद्देशून म्हटले होते. याच विधानाचा आधार घेत ओवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुलबर्ग सोसायटी सामूहिक हत्याकांड झाले होते, तेव्हा तुम्ही नक्की काय घातले होते, असा बोचरा सवाल ओवेसी यांनी ट्विटकरून विचारला आहे. 

वेबदुनिया वर वाचा