सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री या भागात बासित अहमद दार, फहीम अहमद बाबा आणि मोमीन हे तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात कारवाई सुरू केली होती.
सोमवारी रात्री ते मंगळवारी दुपारपर्यंत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात सतत शोधमोहीम राबवली. बुधवारी संध्याकाळी घरोघरी शोध सुरू असताना, एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला.