‘स्टेंट’लला घेऊन वेठीस धरले जाते, तर करा तक्रार

शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (08:48 IST)
पूर्वी ‘स्टेंट’ची किमत १५ हजार ते दीड लाखांपर्यत जात होती. खासगी रुग्णालयांमध्ये ‘स्टेंट’ला घेऊन होणारी रुग्णांची लुटमार लक्षात घेऊन स्टेंटच्या किमतीवर सरकारने नियंत्रण आणले. स्टेंटची किमत सरसकट किमान ७ हजार २०० रुपये व २९ हजार ६०० रुपये केली.  यातच आता स्टेंटचे स्वतंत्र बिल देण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्वच रुग्णालायांना दिले आहे. यामुळे उत्पादक, कंपन्या, वितरक व रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत. चांगल्या दर्जाच्या महागड्या स्टेंट रुग्णालयातून गायब होण्याची शक्यता आहे. काही खासगी इस्पितळांमधील अँजिओप्लास्टी पुढे ढकलण्यास सुरूवात झाली आहे. केवळ तातडीच्या व गंभीर प्रकरणातच रुग्णांना स्टेंट टाकण्यात येत आहे. यासंदर्भातील तक्रारी अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाल्या नसल्यातरी खबरदारी म्हणून त्यांनी टोल फ्री नंबर उपलब्ध करून दिला आहे. औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी केलेल्या आवाहनानुसार, ज्या रुग्णांना ‘स्टेंट’लला घेऊन वेठीस धरले जात असेल, उत्पादक, कंपन्या किंवा वितरक ‘स्टेंट’ देण्यास टाळाटाळ करीत असेल, बील देत नसेल तर या संदर्भातील तक्रार ‘एफडीए’च्या ‘१८००२२२३६५’ या टोल फ्री क्रमांकावर करा. तक्रारीची दखल घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा