आयएफएस अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी मारत केली आत्महत्या

शुक्रवार, 7 मार्च 2025 (14:21 IST)
New Delhi News: भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) एका अधिकाऱ्याने शुक्रवारी आत्महत्या केली. चाणक्यपुरी परिसरातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून अधिकाऱ्याने आत्महत्या केली. पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
ALSO READ: पंतप्रधान मोदी २.५ लाख महिलांना आर्थिक मदत देणार
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृत्यूची पुष्टी केली आणि कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नसल्याचे सांगितले.तसेच हे अधिकारी नैराश्यावर उपचार घेत होते.  
"मृत व्यक्तीचे नाव जितेंद्र रावत असे आहे. तसेच "प्राथमिक तपासात असे दिसून आले की त्याची पत्नी आणि मुले डेहराडूनमध्ये राहत होते. तो पहिल्या मजल्यावर राहत होता आणि चौथ्या मजल्यावर जाऊन त्याने उडी मारली."
ALSO READ: कपाळावर टिकली नाही, भांगेत कुंकू नाही... नवऱ्याला कसा रस असेल? पुण्यात न्यायाधीशांनी केली टिप्पणी
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "आमच्या मंत्रालयातील एका अधिकाऱ्याचे ७ मार्च रोजी सकाळी नवी दिल्लीत निधन झाले. मंत्रालय कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहे आणि दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहे.
ALSO READ: संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टेम रिपोट
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती