पहलगाममधील भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत अनेक पर्यटक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कराच्या व्हिक्टर फोर्स आणि स्पेशल फोर्सेस, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी आणि सीआरपीएफने ही कारवाई सुरू केली आहे. घटनास्थळी लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान उपस्थित आहे.
Edited By- Dhanashri Naik