प्युजो कंपनी यापुढे कार निर्मितीसाठी अॅम्बेसेडर या ब्रँडचा वापर करणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या कराराच्या माध्यमातून मिळालेल्या 80 कोटी रुपयांमधून कर्मचारी आणि इतरांची देणी भागवली जाणार असल्याचं सी. के. बिर्ला ग्रुपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. एकेकाळी पंतप्रधान, राजकीय नेते, मोठे अधिकारी, अभिनेते या सगळ्यांनीच अॅम्बेसेडर गाडीला पसंती दिली होती.