अमरनाथ यात्रा संपली

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (16:40 IST)

काश्‍मिरातील अमरनाथ यात्रेची  सांगता झाली आहे. या यात्रेत एकूण 2 लाख 60 हजार यात्रेकरूंनी भाग घेतला. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतरही यात्रेकरूंचा उत्साह कायम राहिलेला दिसला. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अमरनाथ यात्रेचा समारोप होतो. तथापि, अन्य वर्षांच्या तुलनेत यंदा यात्रेकरूंची संख्या कमी होती. गेल्या चौदा वर्षांतील दुसरी लोएस्ट यात्रा समजली जाते. गेल्या वर्षी सर्वात कमी म्हणजे 2 लाख 20 हजार भाविकांनी यात्रेत सहभागी होऊन दर्शन घेतले होते.  प्रथेप्रमाणे साधुंच्या जथ्याने अमरनाथ गुफेपर्यंत छडी मुबारक नेली तेथे त्याची विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर यात्रा समाप्तीची घोषणा झाली. तेथून छडी मुबारकचा परतीचा प्रवास सुरू झाला असून ही छडी 9 ऑगस्ट रोजी पेहलगाम येथे विसर्जित केली जाणार आहे. 29 जूनपासून ही यात्रा सुरू झाली होती. या यात्राकाळात एकूण 40 यात्रेकरू विविध कारणाने दगावले. त्यात 16 जुलै रोजी जम्मू-श्रीनगर हायवेवर झालेल्या अपघातात ठार झालेल्या 16 यात्रेकरूंचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा