नवीन १७ मागसवर्गीय जाती आरक्षणात समाविष्ट

गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (14:48 IST)
एका बाजूला गुजरात आणि महाराष्ट्रात आरक्षण मिळावे म्हणून मागणी सुरु आहे. मात्र अनेक वर्ष उपेक्षित आयुष्य जागा असलेल्या जुन्या आणि मागास १७ जातींचा मागासवर्गीय विभागात समाविष्ट केले आहे. अने घडले आहे उत्तर प्रदेश येथे. यु पी चे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार उत्तरप्रदेशातील आणखी १७ जातींचा समावेश एससीमध्ये म्हणजेच मागासवर्गीय मध्ये समावेश  करण्यात येणार आहे.यासंदर्भातील प्रस्तावाला युपी मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.त्यामुळे आता या सर्व जाती अनुसुचित जातींमध्ये सामील झाल्या आहे. निवडणुकी आधि  बसपा आणि भाजपला शह देण्यासाठी हे पाऊल तर नाही ना असा राजकीय विचारवंत शंका निर्माण करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा