दिल्लीत धुळीच्या वादळामुळे गोंधळ

शनिवार, 12 एप्रिल 2025 (12:25 IST)
Delhi News : दिल्ली आणि एनसीआर भागात आलेल्या तीव्र वादळामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई सेवा जवळजवळ ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो प्रवासी तासन्तास अडकून पडले.
ALSO READ: महाराज त्यांना कधीही आशीर्वाद देणार नाही, अमित शहांच्या रायगड भेटीवर संजय राऊत यांचा टोला
मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआरमध्ये धुळीच्या वादळामुळे दिल्ली विमानतळावर गोंधळ उडाला. वादळामुळे आयजीआय विमानतळावरील हवाई सेवा जवळजवळ ठप्प झाली. शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या धुळीच्या वादळामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान सेवा आजही विस्कळीत राहिली. विमानांना विलंब झाल्यामुळे शेकडो प्रवासी अडकून पडले. शनिवारी सकाळी परिस्थिती आणखी बिकट झाली. विमानतळावर गोंधळाचे वातावरण होते. तसेच शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली आणि एनसीआर भागात आलेल्या तीव्र वादळामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावरील हवाई सेवा जवळजवळ ठप्प झाली होती. शनिवारी सकाळीही धुळीच्या वादळाचा परिणाम दिसून आला.  
ALSO READ: महाराष्ट्र पोलिसांना मोठे यश, म्यानमारमध्ये सायबर फसवणुकीतून ६० भारतीयांची सुटका
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धुळीच्या वादळानंतर अनेक उड्डाणे वळवण्यात आली किंवा रद्द करण्यात आली. यामुळे दिल्ली विमानतळावर विमानाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. मार्ग बदललेल्या विमानांना दिल्लीला पोहोचण्यास वेळ लागला, ज्यामुळे विमानतळावरील गर्दीत वाढ झाली. अशी माहिती समोर आली आहे.
ALSO READ: एफडीए विभागाने नागपूर जिल्ह्यात कारखान्यावर छापा टाकून ३० लाख रुपयांची सुपारी केली जप्त
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती