एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी ६ राखीव आसने

गुरूवार, 12 जानेवारी 2017 (17:25 IST)
भारताची राष्ट्रीय हवाई कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव ६ आसने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १८ जानेवारीपासून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विमानाच्या पुढच्या भागातील दोन रांगा किंवा सहा आसने आरक्षित करण्यात आली आहेत. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अश्वानि लोहानी यांनी दिली. जगात पहिल्यांदाच अशाप्रकारे कोणत्याही विमानांमध्ये महिलांसाठी आसने राखीव ठेवण्यात येणार आहेत.  एअर इंडियाच्या विमानांमध्ये देण्यात येणारे हे आरक्षण इकॉनॉमी क्लासपुरते मर्यादित असेल.
 

वेबदुनिया वर वाचा