अभिनंदन देशात परत येणार तर इम्रान करणार नरेंद्र मोदी यांना फोन

शुक्रवार, 1 मार्च 2019 (09:37 IST)
राष्ट्रीय स्तरावर जोरदर हालचाली सुरु आहे. भारताने पाकिस्तानवर जबरदस्त दबाव तयार केला आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेतला आहे.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली असून, त्यांच्या  संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितल आहे. वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती समोर येते  आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून केली होती तर, कोणतीच  चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली. सोबत भारताकडून कुटनीतिक स्तरावर वाढवण्यात येणाऱ्या दबावामुळे पाकिस्तानची जबर कोंडी झाली, त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त देखील  आहे. यासंदर्भातील वृत्त इंग्रजी वृत्तवाहिनी  ने दिले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करणार असून, दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी चर्चा करणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. मात्र भारताने फार शांततेत आणि कोणतीही जीवित हानी न करता पाकिस्तानवर दबाव वाढवला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती