केरळमध्ये लाइव्ह टीव्ही शो दरम्यान कृषी तज्ज्ञाचा मृत्यू

शनिवार, 13 जानेवारी 2024 (15:33 IST)
केरळ येथे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये थेट प्रक्षेपण सुरू असताना शुक्रवारी अचानक बेशुद्ध होऊन कोसळून एका कृषी तज्ज्ञाचा मृत्यू झाला. आणि दास असे या कृषी तज्ज्ञाचे नाव आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
 
चॅनलच्या सूत्रांनी सांगितले की, केरळ कृषी विद्यापीठाचे संचालक असलेले डॉ.ए.एस. दास (59) वाहिनीवरील एका कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असताना बेशुद्ध पडले.त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.
 
चॅनलच्या सूत्रांनी सांगितले की, ही घटना दूरदर्शनच्या कृषी दर्शन कार्यक्रमा दरम्यान संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली.
 
त्यांना तातडीनं  वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांना वाचवता  आले नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
अनी दास केरळ कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते.
डॉ. अनि एस. दास हे कोल्लम जिल्ह्यातील रहिवासी होते. ते केरळ पशुधन विकास मंडळाचे (KLDB) व्यवस्थापकीय संचालक आणि जैव संसाधने आणि कृषी सेवा केंद्राचे कार्यकारी संचालक होते.
 
याशिवाय, ते केरळ कृषी विद्यापीठाच्या मनुथी कम्युनिकेशन सेंटरमध्येही प्राध्यापक होते . दूरदर्शनवरील शेतीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये ते अनेकदा तज्ज्ञ म्हणून सहभागी होत असायचे.
या पूर्वी असे घडले आहे. IIT कानपूर येथील विद्यार्थी घडामोडींचे डीन समीर खांडेकर यांना माजी विद्यार्थी परिषदेत आरोग्यावर भाषण करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
 

 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती