आग्रामध्ये दोन स्फोट , कुणीही जखमी नाही

शनिवार, 18 मार्च 2017 (16:56 IST)
आग्रामध्ये दोन ठिकाणी स्फोट झाला आहे. कँट रेल्वे स्टेशनजवळ एक आणि दुसरा स्फोट एका घराजवळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटामध्ये कुणीही जखमी झालं नसून बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेने कालच एका पोस्टरद्वारे ताजमहल उडवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही तासात हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा