नोएडामधील आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सीबीआय कोर्टाने राजेश आणि नुपूर तलवार यांना दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेविरुद्ध त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती.
या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी आरुषिचे वडील राजेश तलवार यांना अटक केली होती. 29 मे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. त्यानंतर सीबीआयनं चौकशी करुन तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातील सर्व सुनावणीनंतर कोर्टानं 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.