कर्मचारी भविष्य निधि संघटनेने (ईपीएफओ) आधार कार्ड नंबर यूएएन नंबरशी जोडण्याची ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे नोकरी बदलल्यानंतर देखील पीफ नंबर बदलण्याची आवश्यकता नाही. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
ही सुविधा ईपीएफओ च्या वेबसाईट ‘www.epfindia.gov.in >> Online Services >> e-KYC Portal>> LINK UAN AADHAAR’ वर उपलब्ध आहे.
या सुविधेचा वापर करून तुम्ही आधार नंबर यूएएन नंबरशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा यूएएन नंबर द्यावा लागेल. त्यानंतर यूएएन नंबर संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी दिल्यानंतर तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यावा लागेल. त्यानंतर अजून एक ओटीपी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल. ओटीपी तपासल्यानंतर यूएएन नंबरशी आधार नंबर लिंक होईल. त्यानंतर ओटीपी दिल्यानंतर तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यावा लागेल. त्यानंतर अजून एक ओटीपी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल. ओटीपी तपासल्यानंतर यूएएन नंबरशी आधार नंबर लिंक होईल.