Guwahati News: गुवाहाटी रेल्वे रेल्वे स्टेशनवर रेल्वे डॉक्टर आणि आरपीएफ महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला अचानक प्रसूती वेदना झाल्या आणि तिने बाळाला जन्म दिला.
मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील एका महिलेने गुवाहाटी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर बाळाला जन्म दिला. सोमवारी, गुवाहाटी रेल्वे स्थानकावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका महिलेला अचानक प्रसूती वेदना झाल्या आणि तिने रेल्वे डॉक्टर आणि रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाळाला जन्म दिला या संदर्भात, ईशान्य सीमा रेल्वे (एनएफआर) चे प्रवक्ते यांनी आज, मंगळवारी सांगितले की, ही महिला राणी कमलापती एक्सप्रेसने आगरतळा ते बरौनी असा प्रवास करत होती. “ट्रेनमध्ये अचानक प्रवाशाला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. माहिती मिळताच, आमच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक ती कारवाई केली आणि सोमवारी गुवाहाटी रेल्वे स्थानकावर त्या महिलेसह तिच्या कुटुंबातील सदस्यांना उतरण्याचा सल्ला दिला." त्यांनी असेही सांगितले की, "ट्रेन गुवाहाटी रेल्वे स्थानकावर पोहोचताच, रेल्वे अधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी, महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांसह, तात्काळ कारवाई केली आणि स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर महिलेची यशस्वीरित्या प्रसूती केली. व महिलेला तिच्या पती आणि नवजात बाळासह पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले.