मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासात गुंतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे बॉम्ब बनवले जात होते. त्याचवेळी बॉम्बचा स्फोट होऊन 3 जणांना जीव गमवावा लागला. जिल्ह्यातील खैरतळा येथील रहिवासी मामून मुल्ला याच्या घरी रविवारी रात्री उशिरा अवैध बॉम्ब बनविण्याचे काम सुरू होते. दरम्यान अचानक बॉम्बचा स्फोट झाला. या काळात तिघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी बन बनवण्याच्या अनेक वस्तूही जप्त केल्याचं बोललं जात आहे.