आता पाचशेच्या अधिक नोटा छापणार १८मिलियन नोटांचे लक्ष्य

गुरूवार, 15 डिसेंबर 2016 (17:19 IST)
नाशिक करंसी प्रेसमध्ये नोटा छापण्याचा वेग वाढविला असून, आता फक्त ५०० च्या नोटा छापाईवर केले गेले आहे.  तर दररोज प्रेस मध्ये आता  रोज १८ मिलियन नोटा या करंसी प्रेसमध्ये छापण्यात येत आहेत. हा वेग रोजच्या कामाच्या ५० टक्के अधिक वाढवला आहे. त्यामुळे चलन तुटवडा काही प्रमाणत कमी होईल असे चिन्हे आहेत.
 
नाशिकच्या करंसी प्रेसमध्ये नोट बंदी नंतर सुमारे  साडेतीनशे ते चारशे दशलक्ष  नोटा छापण्यात आल्या आहेत. तसेच या नोटा नाशिक प्रेसमधून देशात अनेक ठिकाणी रवाना करण्यात आल्या आहेत. तर रोज  सात  लाख मिलियन ५००च्या नविन नोटा रोज छापण्यात येत आहेत. त्याच बरोबर २०,५०,१०० च्या नोटादेखील नाशिकच्या करंसी प्रेसमध्ये छापन्यात येत आहेत. अशी माहीती मजदूर यूनियन संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यानी दिली. 
 
प्लास्टिकच्या नवीन नोटा चलनात आण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. या नवीन नोटा नाशिकच्या करंसी प्रेसमध्ये छापणे शक्य आहे. एवढेच नाही तर या नोटा छापण्याचा अनुभव येथील कामगराना आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे काम नाशिकच्या करंसी प्रेसला दयावे, अशी मागणीही करंसी प्रेसच्या मजदूर यूनियन संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा