10 डिसेंबरपर्यंतच 500 च्या नोटा चालतील

केंद्र सरकारने 10 डिसेंबरपासून रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये जुन्या 500 रूपयांच्या नोटा वापरण्यावर बंदी आणली आहे. यापुर्वी या ठिकाणांवर 15 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत 500 च्या नोटा वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. या निर्णयात बदल करत 10 डिसेंबरपर्यंतच 500 च्या नोटा वापरता येतील असे सांगितल आहे. 
 
पेट्रोल पंप आणि विमान तिकीटांसाठी 500 रूपये वापरण्यावर यापुर्वीच बंदी घातली आहे.  विमान तिकीटांसाठी 500 ची नोट वापरता येईल असं आधी सांगण्यात आलं होतं मात्र, नंतर निर्णय बदलून 2 डिसेंबरपर्यंत सवलत देण्यात आली.    

वेबदुनिया वर वाचा