सदर घटना सोमवार 4 मार्च ची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित कुमार त्यांची पत्नी आणि मित्र परिवार गुरुग्रामच्या सेक्टर 90 मध्ये एका रेस्टारेंट मध्ये जेवायला गेले होते. जेवल्यानन्तर त्यांना कर्मचाऱ्यांनी माऊथ फ्रेशनर खायला दिले. ते खाल्ल्या नंतर काही वेळाने पाच जणांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्यांची प्रकृती बिघडू लागली. एवढे असून देखील रेस्टारेंटच्या मालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी आमची कुठलीही मदत केली नाही.