वर्क फ्रोम होमला ५ महिन्यांची मुदत वाढ

गुरूवार, 23 जुलै 2020 (08:41 IST)
देशभरातील आयटी आणि बीपीओ कंपन्यांचे कर्मचारी आता वर्ष अखेरपर्यंत घरूनच काम करू शकतील. यापूर्वी ही मुदत ३१ जुलै पर्यंतच देण्यात आली होती. मात्र, आता सरकारने त्यामध्येही पुढे ५ महिन्यांची वाढ केली आहे.
 
'DoT India' या सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. देशातील कोरोनाची स्थिती पाहता घरूनच काम करण्याच्या  नियमामध्ये शिथिलता देत बीपीओ आणि आयटी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना डिसेंबर अखेरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याची मुभा असेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
भारतामध्ये प्रामुख्याने बंगळूर, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे येथे आयटी हब आहेत. दरम्यान, दिवसागणिक देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशात तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रातील व्यवहार, कामकाज सुरळीत सुरू रहावे याकरिता आता केंद्र सरकारने नियमांमध्ये शिथिलता देत पुढील मुदतवाढ दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती