जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा येथील लस्सीपूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. चौघेही लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. चौघांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.