“2 जी स्पेक्‍ट्रम’ प्रकरणांचे तपासकर्ता राजेश्‍वर सिंह यांची रजा रद्द

मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (13:20 IST)
“2 जी स्पेक्‍ट्रम’ प्रकरणांचा तपास करत असलेल्या सक्‍तवसुली संचलनालयाचे (ईडी) प्रमुख तपास अधिकारी असलेल्या राजेश्‍वर सिंह यांची रजा सरकारने रद्द केली आहे. विधी शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजेश्‍वर सिंह यांनी गेल्या महिन्यापासून रजा घेतली होती. मात्र आज कोणतेही कारण न देता ही रजा रद्द करण्यात आली. राजेश्‍वर सिंह यांनी तत्कालिन वित्त सचिव हसमुख आधिया यांना काही महिन्यांपूर्वी पत्र लिहील्यामुळे त्यांची चौकशी केली जात होती. राजेश्‍वर सिंह सध्या आजारपणाच्या रजेवर आहेत.
 
“घोटाळे आणि घोटाळ्यांशी संबंधित व्यक्‍तींविरोधात तपास केल्याने आपल्याविषयी कटूता वाटते का ?’ असा प्रश्‍न राजेश्‍वर सिंह यांनी हसमुख आधिया यांना लिहीलेल्या पत्रामध्ये विचारला होता. राजेश्‍वर सिंह यांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठीची रजा अर्थ मंत्रालयाच्या अख्त्यारित असलेल्या महसूल विभागाकडून नामंजूर तर झालीच. पण वैद्यकीय कारणासाठीही रजा नाकारली गेली. सिंह यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, असेकाही अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
“ईडी’चे संचालक कमाल सिंह यांनी सहसंचालक राजेश्‍वर सिंह यांना “एलएलएम’ पूर्ण करण्यासाठी गेल्याच महिन्यात दोन वर्षांची रजा मंजूर केली होती. त्यानंतर जागेवर महसूल विभागातील अधिकारी संजय कुमार मिश्रा यांची “ईडी’च्या प्रमुखपदी नियुक्‍ती करण्यात आली.
 
“पीएमएलए’कायद्यांतर्गत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर 25 ऑक्‍टोबर रोजी आरोपपत्र दाखल करणे हे राजेश्‍वर सिंह यांच्याकडील अखेरचे काम राहिले होते. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांच्या विरोधात एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणी आरोपपत्र प्रलंबित असल्याने राजेश्‍वर सिंह यांना “एलएलएम’ करण्यासाठीची सुटी नाकारली गेली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती