एटामध्ये स्कूल बस-ट्रक अपघात, 15 विद्यार्थी ठार

लखनऊ- दाट धुक्यामुळे उत्तर प्रदेशमधील एटा येथे अलीगंज रोडवर स्कूल बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन 15 विद्यार्थी ठार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात ३४ जण जखमी झाले आहेत. ही बस जे. एस. स्कूलची होती. 
 
दाट धुक्यामुळे पुढील वाहनाचा अंदाज आला नाही आणि बसची एका ट्रकला जोराची धडक बसली. घटनेची माहिती मिळताचा पोलिस घटनास्थळी आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा