बर्थडे पार्टीत 13 वर्षीय मुलीवर बलात्कार

नवी दिल्ली- पश्चिम दिल्लीच्या उत्तम नगर क्षेत्रात एका बर्थडे पार्टीत दोन मित्रांनी 13 वर्षीय मुलीला पेय पदार्थात मादक द्रव्य मिसळून तिच्यावर बलात्कार केला. पीडिताने सांगितले की 13 डिसेंबर रोजी तिच्या मित्रांनी वाढदिवसानिमित्त तिला आपल्या घरी आमंत्रित केले होते, जिथे कोल्ड ड्रिंक सर्व्ह केले गेले ज्यात मादक द्रव्य मिसळलेले होते.

पोलिस अधिकारीप्रमाणे, पेय पदार्थ पिण्यानंतर तिने भान गमवला आणि तिने आरोप केला की तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आहे. ते मुलं तिला पश्चिम दिल्लीच्या एका हॉस्पिटलजवळ सोडून गेले. प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा रात्रीच्या तीन वाजता एक राहगीरने तिला बेसुध अवस्थेत बघितले. ती घरी पोहचली आणि आपल्या पालकांना प्रकरण सांगितले आणि मग पोलिसांशी संपर्क साधला.

वेबदुनिया वर वाचा