दररोज 1200 टन कचरा निर्माण होतो, तरीही इंदूर सलग 5व्यांदा सर्वात स्वच्छ शहर असण्याचा मानकरी

शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (13:16 IST)
मध्य प्रदेशची औद्योगिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या इंदूर शहरात दररोज 1200 टन कचरा निर्माण होतो, मात्र त्यानंतरही शहरात अस्वच्छता दिसून येत नाही. त्यामुळेच या शहराने सलग पाचव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान मिळवला आहे. दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री भूपेंद्र सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. 

इंदूर शहराला 2017 पासून सातत्याने स्वच्छता अभियानांतर्गत सर्वात स्वच्छ शहर म्हणून सन्मानित केले जात आहे. यावेळी इंदूरला सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये सर्वोत्कृष्ट शहर म्हणून गौरवण्यात आले आहे. यामध्ये स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमांतर्गत केवळ स्वच्छतेचे कामच होत नाही तर या माध्यमातून लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला जात आहे. इंदूर हे धूळमुक्त शहर म्हणून ओळखले जाते. येथे नदी नाल्यांचे घाण पाणी पुन्हा वापरण्यायोग्य बनविण्याचे कामही केले जाते. 
 
 इंदूर शहरातील कचरा व्यवस्थापन 1200 टन कचरा निर्माण करतो त्यापैकी 700 टन ओला कचरा आहे. खत आणि बायोमिथेनायझेशन प्लांटचा वापर करून कचरा व्यवस्थापनातूनही महसूल मिळतो. शहरातील 137 किमी नदी-नाले स्वच्छ करण्यासाठी 343 कोटी रुपये वापरले जातात. शहरात 450 टन सुका कचरा निर्माण होतो, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या इंदूर महापालिकेला दोन कोटी रुपये देतात. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती