पासपोर्ट फीमध्ये 10 टक्क्यांची कपात

पासपोर्ट फीमध्ये 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी  पासपोर्ट फीमध्ये कपात केल्याची घोषणा केली आहे. पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज करत असताना आता 10 टक्के कमी फी भरावी लागणार आहे. मात्र ही कपात सर्वांसाठी नसून फक्त आठ वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिकांनाच याचा फायदा मिळणार आहे. इतरांना मात्र आधी होती तितकीच फी भरावी लागणार आहे.
 
सुषमा स्वराज यांनी अजून एक महत्वाची घोषणा केली असून यापुढे जारी करण्यात येणारे नवीन पासपोर्ट हिंदी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध असणार आहेत. याआधी पासपोर्ट फक्त इंग्रजी भाषेतच मिळत होते. पण पासपोर्टवरील संबंधित व्यक्तीच माहिती ही इंग्रजीमध्येच असणार आहे. पासपोर्ट अॅक्ट लागू होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुषमा स्वराज यांनी एका स्टॅम्पचं अनावरण केलं.

वेबदुनिया वर वाचा