‘कट्टी’नंतर युतीची पुन्हा ‘गट्टी’

बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (16:13 IST)
कधी ‘होणार... होणार...’ तर कधी ‘मुळीच नाही, नाही, नाही...’ अशा वावड्या उठत असणार्‍या युतीचे घोडे आत गंगेत भिजणार असल्याचे संकेत थेट दिल्लीतून मिळाले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव यांचा रुसवा-फुगवा काढण्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले असून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास शिवसेनेने ‘मम’ म्हणले आहे. विशेष म्हणजे या मोबदल्यात सेनेला राज्याबरोबरच केंद्रातही मंत्रीपदाचा नजराणा मिळणार आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा