36 हजार कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर खरेदी व्वहारात भारतीय नेते आणि अधिकार्यांना 125 कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचे इटालिन न्यायालयात यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मनिलाँडरिंग प्रतिबंध काद्याच्या विशेष न्यायालयात ‘ईडी’ने तेराशे पानांची तक्रार चालू आठवडय़ात दाखल केली आहे. मिशेल याला 30 दशलक्ष युरो (225 कोटी रुपये) ऑगस्टा वेस्टलँडकडून मिळाले होते. बारा हेलिकॉप्टरचा व्ववहार पूर्ण करणसाठी ही रक्कम लाच देण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे.
न्यायालय लवकरच ‘ईडी’ने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेणची शक्यता आहे. गुइडो हेश्चे, कारलो गेरोसा या दोघांची ‘ईडी’ आणि सीबीआने यापूर्वीच चौकशी केलेली आहे. आता मिशेल याची चौकशी करण्यासाठी सीबीआयने इंटरपोलमार्फत रेडकॉर्नर नोटीस बजावली आहे.