‍विकास असेल तर नक्षलवाद वाढणार नाही- राहुल

जिथे नक्षलवाद असतो, तिथे विकास होऊ शकत नाही आणि ज्या भागात विकास होत नाही, तेथेच नक्षलवाद वाढतो असे मत व्यक्त करत कॉग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी गैर कॉंग्रेसी राज्यांनाच नक्षलवादासाठी जबाबदार मानले आहे.

राज्य सरकार सामान्यांपर्यंत पोहचत नसल्यानेच नक्षलवाद वाढतो. ग्रामीण भागातील गरजा अपूर्ण राहिल्याने नक्षलवादाला खतपाणी मिळत असल्याचे ते म्हणाले.

देशात नक्षलवाद वाढत असल्याची चिंता व्यक्त करतानाच नक्षलवादाला नियंत्रणात आणण्याचे सर्व प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा