हेडफोन लावून गाणं ऐकत होता, करंटने मृत्यू

बैतुल- मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्याच्या जाजलपुर गावात एक युवक मोबाइल चार्जिंगवर लावून हेडफोनने गाणं ऐकत होता, त्या दरम्यान विद्युतच्या बोर्डाने बाहेर येत असलेल्या वायरमध्ये करंट पसरून हेडफोनमध्ये आला, ज्यामुळे त्या मुलाची मृत्यू झाली.
 
पोलीस सूत्रांप्रमाणे 27 वर्षीय सुनील मोबाइल चार्जिगला लावून हेडफोनवर गाणी ऐकत होता. त्या दरम्यान करंट लागल्यामुळे त्याचे दोन्ही कान जळून गेले. त्याला लगेच रूग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी प्रकरण नोंदले असून तपास सुरू केली आहे.

वेबदुनिया वर वाचा