हनुमान गढी मंदिरात घेतले दर्शन

शनिवार, 10 सप्टेंबर 2016 (09:46 IST)
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू मते काँग्रेसकडे वळविण्यासाठी काँग्रेसचे उपाध्क्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्येला जाऊन हनुमान गढी मंदिरात प्रार्थना केली. 
 
1992 मध्ये वादग्रस्त इमारत पाडण्यात आल्यानंतर नेहरू-गांधी कुटुंबातील अयोध्येस भेट देणारे राहुल हे पहिलेच आहेत. वादग्रस्त राम जन्मभूमी- बाबरी मशीद जागेपासून हनुमान गढी 1 कि.मी. अंतरावर आहे. राम मंदिर उभारणीसाठी 1989 मध्ये करण्यात आलेल शिलान्यासाच्या ठिकाणी मात्र राहुल यांनी भेट दिली नाही.
 
हनुमान गढी मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी 46 वर्षाच्या राहुल यांनी विश्व हिंदू परिषदेस कडाडून विरोध करणार्‍या महंत गनदास यांची भेट घेतली.   

वेबदुनिया वर वाचा