प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू स्वामी परमहंस नित्यानंद यांच्या कथित सेक्स स्कॅंडलचा पर्दाफाश एका तमिळ नियतकालिकाने व एका स्थानिक टिव्ही चॅनेलने स्टिंग ऑपरेशनद्वारे केला.
नित्यानंद एका तमिळ अभिनेत्रीबरोबर गुलछर्रे उडविताना दिसत असल्याचे या नियतकालिकाने काढलेल्या फोटोतून दिसते. अर्थात, हे फोटो कोठे घेतले हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दरम्यान, या घटनेची प्रतिक्रिया तमिळनाडू व कर्नाटकात उमटली आहे. काही जणांनी नित्यानंदांच्या आश्रमावर दगडफेक केली. तर त्यांच्या शिष्यांच्या मते हा आमच्या गुरूंना बदनाम करण्याचा कट आहे. हे फोटो तांत्रिकरित्या मिक्स करून तयार करण्यात आले आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.
दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत एका अध्यात्मिक बाबाला काही तरूणींसोबत पकडण्यात आले होते. त्यानंतर लगोलग हे प्रकरण उघडकीस आले आहे.