सचिन-धोनीस सुखोईचे दरवाजे बंद

रविवार, 7 ऑक्टोबर 2012 (18:03 IST)
FILE
ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या सुखोई उडानाच्या स्वप्नास जमीनीवर आणताना भारतीय वायु सेनेने दोन्ही खेळाडूंसाठी आपले दरवाजे बंद केले आहे.

दोन वर्षांअगोदर वायु सेनेने सचिनला मानद ग्रुप कॅप्टन रँक दिली देऊन त्याला सुखोई-30 एमकेआय मधून सवारी करण्याची संधी दिली जाईल, अशीही घोषणा केली होती.

FILE
देशातील तरूणांना वायु सेनेकडे आकर्षित करण्यासाठी सप्टेबर, 2010 मध्ये तत्कालीन वायुसेना प्रमुख पीवी नाईक यांनी सचिनला ग्रुप कॅप्टन मानद रँक देऊन गौरवान्वित केले होते. गेल्यावर्षी विश्वकरंडक जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीस त्यांनी एअर हाउस मध्ये बोलावून सन्मानित केले होतो. दोघांनाही सुखोई सवारीची घोषणा करण्यात आली होती.

FILE
ग्रुप कॅप्टनची रँक मिळाल्यापासून सचिन ने वायुसेनेकडे वळूनणही पाहिले नसल्याचे सेनेतील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या पार्श्वभूमीवर भविष्यात कुणाला मानद रँक देण्याचे औचित्यच काय असा प्रश्न त्यांनी विचारला.

वरिल खेळाडूंना सुखोई उडाणाबाबत विचारले असता, आमच्याकडे आणखीही गंभीर काम असून सुखोईचे कॉकपीट या कामासाठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा