संसद परिसरात नीलगाय

गुरूवार, 26 मे 2016 (14:45 IST)
संसद परिसरासारख्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये नीलगाय आढळल्याने खळबळ उडाली आहे. संसदेसमोरच्या विजय चौक परिसरात एक नीलगाय आरामात फिरत असल्याचं दिसून आलं.

मंत्री, खासदार, व्हीआयपींचा राबता असलेल्या संसदेच्या परिसरात नीलगाय शिरल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पशुपालन विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र तब्बल दोन तासांनंतरही पशुपालन विभागाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहचला नव्हता.
त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या जागेची सुरक्षाव्यवस्था रामभरोसे आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

वेबदुनिया वर वाचा