शेतकरी जोडप्याची आत्महत्या

बुधवार, 27 फेब्रुवारी 2008 (23:13 IST)
अकोला जिल्ह्यातील खराडसवांगी येथील शेतकरी दाम्पंत्याने बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे आज विष घेऊन आत्महत्या केली.

एका वर्षापूर्वी गुलाबराव ठोकरे आणि मीरा यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर शेती करण्यासाठी त्यांनी स्थानिक बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, शेतात पीक कमी आल्यामुळे ठोकरे यांना कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. कर्ज फेडण्याची चिंता आणि बॅंकेकडून सतत येणार्‍या नोटीशीला कंटाळून या दाम्पंत्याने आज आत्महत्या केली.

वेबदुनिया वर वाचा