दिल्लीतल्या इंदिरा गांधी विमानतळावर शशिकला यांनी डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांच्या कानाखाली लगावल्या होत्या. शशिकला राज्यसभेत बोलत असतानाच तमिळनाडूत जयललिता यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांची ही कृती पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचं सांगत जयललितांनी ही कारवाई केली.