वाढदिवसानिमित्त मोदी गुजरातमध्ये...

शनिवार, 17 सप्टेंबर 2016 (12:04 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार सकाळी आपल्या 66व्या वाढदिवसानिमित्त आईला भेटले आणि त्यांच्याकडून आर्शीवाद घेतला.  ही पंतप्रधान यांची तिसरी गुजरात यात्रा आहे. मोदी यांच्या गुजरात दौर्‍याशी निगडित प्रत्येक माहिती ... 
 
वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.  
 
वाढदिवसानिमित्त आईची भेट घेण्यासाठी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फक्त कार होती. ताफा किंवा अधिका-यांना सोबत नेणं त्यांनी टाळलं.
 
वाढदिसानिमित्त आईची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगरमध्ये दाखल.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. मोदींचा 66वा वाढदिवस आहे. यंदा मोदी त्यांचा वाढदिवस त्यांच्या जन्मगावी म्हणजेच गुजरातमधील नवसारीमध्ये साजरा करणार आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी एक टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवण्यात आला आहे. विज्ञान, क्रीडा आणि कलेसह विविध क्षेत्रात भरीव योगदान देत देशाला गौरवान्वित करणाऱ्या देशातील सुकन्यांना सन्मानित करण्यासाठी ‘ एम्पॉवरिंग डॉटर्स : एम्पॉवरिंग इंडिया’ असा अनोखा संदेशही या केकवर कोरला जाणार आहे.
 
मोदींची आई त्यांचा लहान भाऊ पंकज मोदीसोबत गांधीनगरमध्ये राहते.  
 
मोदी शुक्रवारी रात्री अहमदाबाद पोहोचले. स्थानीय विमानतळावर मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले.  
 
महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.   
 
राज्यपाल ओपी कोहली, मुख्यमंत्री विजय रूपानी समेत पूर्ण गुजरात कॅबिनेट, भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी आणि पक्षाचे बरेच नेता आणि कार्यकर्त्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.  
 
आपल्या भव्य स्वागतानंतर मोदींनी गुजरात भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांचा शुक्रिया अदा केला आणि सरळ गांधीनगर स्थित राज भवन गेले जेथे ते रात्री थांबले.  
 
आईच्या भेटीनंतर पंतप्रधान आदिवासी बहुल दाहोद जिल्ह्यात जातील आणि कृषीशी निगडित विभिन्न परियोजनांचे उद्घाटन करतील.  

वेबदुनिया वर वाचा