रामपालच्या अंघोळच्या दुधातून आश्रमात बनायची खीर

शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (10:49 IST)
स्वयंघोषित अध्यात्मिक संत रामपालबाबत एकसे बढकर एक खुलासे समोर येत आहेत. बाबाची दुधाने अंघोळ घातली जायची. विशेष नंतर त्या दुधाची खीर बनवली जायची व भक्तांना प्रसाद म्हणून दिली जात होती.  
 
बाबाच्या अंधभक्तांनी सांगितले की, ही खीर खाल्याने चमत्काराची शक्यता वाढत असे. 45 वर्षीय भक्त मनोज याने सांगितले की, रामपालला ज्या दुधाने अंधोळ घातली जात होती त्या दुधाची खीर बनवली जायची. मनोज बाबाच्या सत्संगला आले होते. दरम्यान इतर भक्तांनी अशा प्रकारे खीर बनविली जात होती याची माहिती नसल्याचे सांगितले. बाबाच्या अंधोळीच्या दुधाची खीर बनत नव्हती पण ज्या दुधाची खीर बनविण्यात येत होती ते दूध आतील छताच्या पाईपमधून खाली यायचे. 
 
बाबा जेव्हा ध्यान धारणा करायला बसत होते तेव्हा त्यांना दुधाने अंधोळ घालण्यात येत असल्याचे 29 वर्षीय कृष्ण यांने सांगितले. कृष्‍ण सध्या जखमी आहे. बाबाला अटक करण्यात आली तेव्हा झालेल्या चेंगराचेंगरीत तो जखमी झाला होता. ध्यानाचे आशीर्वाद दुधात येत असत आणि त्या दुधाचा प्रसाद म्हणून खीर बनविण्यात येत होती. 

वेबदुनिया वर वाचा